माळी समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती सदाशिव बोरावके उर्फ अण्णा यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


        शिवाजीनगर येथील माळी समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती सदाशिव बोरावके उर्फ अण्णा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .ते ८६ वर्षांचे होते . त्यांच्यामागे पत्नी , दोन मुले , सुना व नातवंडे असा परिवार आहे .


       माळी समाजातील गेली ४५ वर्षांपासून पाच हजार विवाह त्यांनी जुळविले होते . आदेश बोरावके वधू वर सूचक केंद्राचे ते संचालक होते . विवाह जमविताना आलेल्या अनुभवाचे त्यांनी " कुर्यात सदा मंगलम " हे पुस्तक लिहले होते . महाराष्ट्रातील माळी वधू वर केंद्राचे आधारस्तंभ होते . देशातील परदेशातील हजारो वधू वरांचे संसार जुळवून आणले . माळी समाजातील वधू वरांच्या अनुरूप जोडया जमविल्या . महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण खात्यामधून मृदू सर्वेक्षक म्हणून काम करून सेवानिवृत्त झाले होते .