एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा मंगळवारी पाचवा वर्धापन दिवस 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 पुणे, ता. 10 :- एमआयटी आर्ट, डिझाईऩ आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिवस मंगळवारी ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० : ०० वाजता ऑनलाईन माध्यमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे उपस्थित राहणार आहेत. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ. दा. कराड, विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री प्रमोद काळे, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राघवराव केएसएमएस हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिली.