पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टिम आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी रितेश अग्रवाल हे सल्लागार म्हणून काम करतील तसेच यासाठी देशातील सर्वात मोठ्या इन्क्युबेटर, व्हेंचर कॅटलिस्ट (व्हीकॅट्स) सोबत काम करणार आहेत. याद्वारे देशातील १,२,३ टीअर शहरांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मदत केली जाईल. भारत ही जगातील सर्वात मोठी आणि वेगाने विस्तारणारी स्टार्ट-अप इकोसिस्टिम आहे. तिला पुढे जाण्यासाठी परस्परांना मदत करणा-या तसेच एकत्रितपणे वृद्धी करण्यासाठी अधिकाधिक अनुभवी आणि यशस्वी लोकांची गरज आहे. जेणेकरून आपला देश ‘आत्मनिर्भर भारत’ (स्वावलंबी भारत) बनू शकेल. देशाला आधार देण्यासाठी डॉ. अपूर्व शर्मा यांच्यासोबत रितेश यांनी या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. रितेश यांनी २०१२ मध्ये ओरॅव्हेल स्टेजची सुरुवात केली आणि २०१३ मध्ये ओयो उभारले, तेव्हा त्यांना पाठिंबा देणा-या लोकांमध्ये शर्मा हे पहिले व्यक्ती होते.
रितेश अग्रवाल यांनी सांगितले की, "व्हीकॅट्स यांच्या सहकार्याने भारतातील लहान शहरांतून येणाऱ्या तरुण उद्योजकांना सक्षम बनवण्याची माझी इच्छा आहे, ज्यांना मोठ्या शहरांतील तसेच मेट्रो सिटीजमधील उद्योजकांप्रमाणे समान संधी मिळत नाहीत. टीअर ३ आणि टीअर ४ शहरांतून पुढे एखादी मोठी कल्पना मिळू शकेल, असा मला आत्मविश्वास आहे”.
व्हेंचर कॅटलिस्ट्सचे संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा यांनी सांगितले की, "रितेशची अंतर्दृष्टी उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भारतातील सर्व १,२,३ आणि ४ टीअर शहरांमध्ये स्टार्टअपसाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार करण्याची आमची योजना आहे. रितेशच्या अनुभवांमुळे अनेक नवोदित उद्योजकांना मदत होईल. भविष्यात युनिकॉर्न बनण्याची क्षमता असलेल्या मात्र योग्य आधार व मार्गदर्शनाचा अभाव असलेल्या, पुढील उद्योजकांसाठी हे अत्यंत मौल्यवान ठरू शकते."