वित्तीय क्षेत्राच्या नेतृत्वात सेन्सेक्सने घेतली ४७७ अंकांची उसळी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकांनी आज सलग दुसऱ्या दिवशी वृद्धी घेतली. या वृद्धीचे नेतृत्व वित्तीय क्षेत्राने केले. निफ्टीने १.२३% किंवा १३८.२५ अंकांची वृद्धी घेतली व तो ११,३८५.३५ अंकांवर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील १.२६% किंवा ४७७ अंकांनी वाढून ३८,५२८.३२ अंकांवर बंद झाला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १८६० शेअर्सनी नफा कमावला, ८८६ शेअर्स घसरले तर १३२ शेअर्स स्थिर राहिले. ग्रासिम (६.५०%), अल्ट्रा टेक सिमेंट (३.३३%), कोटक महिंद्रा बँक (३.०१%), जेएसडब्ल्यू स्टील (३.१२%) आणि झी एंटरटेनमेंट (२.७०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर बीपीसीएल (१.२५%), टेक महिंद्रा (०.९१% ), एचसीएल टेक (०.५६%). सिपला (०.८०%) आणि आयओसी (०.५१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात व्यापार केला. फक्त फार्मा क्षेत्राला काहीसे नुकसान झाले. बीएसई मिडकॅप १.१६% नी वाधरले तर बीएसई स्मॉलकॅप १.३३% नी वाढले.


 


वास्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड: कंपनीने २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ तोटा ३७.३ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले तसेच एकत्रित महसूलदेखील ६६.८ टक्क्यांनी घसरल्याचे म्हटले. त्यानंतर वास्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडचे स्टॉक्स ५.२२% नी घसरले व त्यांनी १०.९० रुपयांवर व्यापार केला.


 


पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड: कंपनीचे शेअर्स ८.७२% नी वाढले व त्यांनी २६१.९० रुपयांवर व्यापार केला. इक्विटी शेअर्सचा विमा किंवा इतर सिक्युरिटीजद्वारे निधी गोळा केला जाईल, या मुद्द्यावर सदस्य मंडळाची बैठक होण्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर शेअर्समध्ये वरील वाढ दिसून आली.


 


बिर्लासॉफ्ट लिमिटेड: कंपनीने मायक्रोसॉफ्टसोबज जागतिक धोरणात्मक क्लाउड भागीदारीची घोषणा केली. ग्राहकांना त्यांचा डिजिटल प्रवास वाढवण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली. या घोषणेनंतर कंपनीचे स्टॉक्स १४.६९% नी वाढले व त्यांनी १७२.२० रुपयांवर व्यापार केला.


 


 


 


व्होल्टास लिमिटेड: एसी निर्माता व्होल्टास लिमिटेडने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा १०२.८६ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. कंपनीचा निव्वळ नफा ३०.०५% नी घसरला तर निव्वळ विक्री ५०.३४% नी घटली. तरीही कंपनीच्या शेअर्सचे मूल्य २.४३% नी वाढले व त्यांनी ६४४.४० रुपयांवर व्यापार केला.


 


भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.७५ रुपयांचे मूल्य कमावले.


 


सोने: सोन्याच्या किंमतींनी २००० डॉलरची पातळी ओलांडत १ टक्क्यांची वाढ घेतली. अमेरिकी डॉलरमध्ये दोन वर्षातील निचांक गाठल्यामुळे हे परिणाम दिसून आले.


 


जागतिक बाजार: अमेरिका-चीनमधील तणाव निवळत असल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली. परिणामी आशियाई तसेच युरोपियन बाजारात सकारात्मक संकेत दिसले. नॅसडॅकमध्ये १.००%, एफटीएसई १०० मध्ये ०.२९% ची, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.८५%ची वाढ झाली. तर निक्केई २२५ कंपनीचे शेअर्स ०.२०% घसरले तर हँगसेंगचे शेअर्स ०.०८% नी वाढले.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image