ओरिफ्लेमद्वारे लव्ह नेचर प्युरिफाइंग फेस ऑइल सादर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ओरिफ्लेमद्वारे लव्ह नेचर प्युरिफाइंग फेस ऑइल सादर


 


मुंबई, १० ऑगस्ट २०२०: प्रमुख डायरेक्ट सेलिंग स्विडिश ब्यूटी ब्रँड, ओरिफ्लेमने नेहमीच स्वीडिश निसर्गाकडून प्रेरणा घेतली असून नैसर्गिक अर्कयुक्त सौंदर्य उत्पादने बनवणा-या जगातील सुरुवातीच्या कंपन्यांमध्ये याचा समावेश आहे. ओरिफ्लेमने आपल्या लव्ह नेचर श्रेणी अंतर्गत ऑर्गेनिक टी ट्री आणि लिंबू असलेले लव्ह नेचर प्युरिफाइंग फेस ऑइल सादर केले आहे. डाग दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या अद्भुत तेलात जीवाणूविरोधी टी ट्रीसह सुगंधी तेल, लाभकारक लिंबू आणि सॅलिसिलिक अॅसिडचा नैसर्गिक अर्क आहे.


 


हे फेस ऑइल विशेषत: तैलीय त्वचेसाठी तयार करण्यात आले आहे. म्हणजेच ज्यांच्या त्वचेवर डाग आणि छिद्र बंद होण्याचा धोका जास्त असतो, त्यांच्यासाठी हे उत्पादन आहे. हे तेल या छिद्रांना मोकळे करत त्वचा स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी मदत करून यातील अडथळे दूर करते. हे लावल्यावर त्वचा टवटवीत, खूप हलकी वाटते. तसेच मनाला आल्हाददायक अशा फ्लोरल-सिट्रस सुगंधासह, हा फॉर्म्युला पॅराबेन-फ्री आणि त्वचेसाठी तपासून घेतलेला आहे.


 


ओरिफ्लेम दक्षिण आशियाचे रिजनल मार्केटिंगचे सीनियर डायरेक्टर श्री नवीन आनंद म्हणाले, “ओरिफ्लेममध्ये आम्ही त्वचेसंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी निसर्गावर विश्वास ठेवतो. आमच्या भव्य लव्ह नेचर रेंजमध्येही हेच दिसून येते. या नव्या उत्पादनासह, आम्ही तेलकट त्वचा, अशा त्वचेच्या परिणामांमुळे डाग, त्वचेवरील छिद्र बंद होणे इत्यादीने त्रस्त असलेल्या लोकांना सेवा देत आहोत. हे तेल हलके आणि चेह-यावरील त्वचेसाठी एकदम योग्य आहे. हे कधीही चिकटपणाचा अनुभव देत नाही तसेच काही काळातच डागांविरोधात काम करते. आम्हाला विश्वास आहे की, हे उत्पादन संपूर्ण देशातील ब्युटी सेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करेल.”


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image