बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


~ इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी आकर्षक वित्तीय पर्याय उपलब्ध करून देणार ~


 


मुंबई, १६ ऑगस्ट २०२०: आरआर ग्लोबलच्या बीगॉस कंपनीने मनीटॅपशी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. मनीटॅप हे भारतातील पहिले अॅप बेस्ड क्रेडिटलाइन असून याद्वारे बीगॉस इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांना परवडणाऱ्या आणि पारदर्शी वित्तीय योजना शून्य टक्के व्याजदरासह उपलब्ध करून दिल्या जातील. ही सुविधा बी८ आणि ए२ मॉडेल आणि त्यातील पाच प्रकारांसाठी उपलब्ध आहे.


 


जुलै २०२० मध्ये, एलआय टेक्नोलॉजी, लिथियम आयन आणि लिड अॅसिड प्रकारातील बी8 आणि लिड अॅसिड आणि लिथिअम आयन प्रकारातील ए२ यांची कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. पुणे, नवी मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू येथे ऑगस्ट २०२० च्या मध्यापासून स्कूटरचे वितरण सुरू होईल.


 


ग्राहकांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेता, बीगॉससाठी मनीटॅप ईएमआय फाननान्सिंग ऑप्शन पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच संपूर्ण अनुभव सेल्फ इएमआय चेकआउट प्रक्रियेसह संपर्कहीन राहिल अशा रितीने तयार करण्यात आला आहे. कर्जाची पात्रता आणि मंजुरीची प्रक्रिया पाच मिनिटात पूर्ण करता येऊ शकते. तसेच प्रशिक्षित लोक ग्राहकांना त्यांच्यासाठी योग्य अशा योजनेची निवड करण्यासाठी मार्गदर्शन करतील. ग्राहकांना ६ ते ३६ महिन्यांपर्यंत असा दीर्घ परतफेडीचा कालावधीही ऑफर करण्यात येत आहे.


 


मनीटॅपचे सहसंस्थापक, श्री अनुज काकेर यांनी सांगितले की “बीगॉससोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. हा ब्रँड भारताला पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक स्कूटर चळवळीत मोठी झेप घेण्यास मदत करेल. इलेक्ट्रॉनिक वाहनांना शहरी लोकसंख्येकडून मोठी मागणी मिळेल, असा आमचा अंदाज आहे. आमच्या संशोधनानुसार असे दिसून येते की, कोव्हिड नंतरच्या जगात लोक सार्वजनिकक वाहतूक किंवा टॅक्सीऐवजी वैयक्तिक मोबिलिटी उपयांना प्राधान्य देतील. ग्राहकांना कर्ज देणारी भागीदार म्हणून संभाव्य बीगॉसच्या ग्राहकांना किफायतशीर सुविधा देण्यावर आमचा भर असेल.”


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*