विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत


ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


 


पुणे दि. 19: - विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे- 411007 यांच्या विद्यमाने दिनांक 24 ऑगस्ट 2020 पासुन ते 02 सप्टेंबर 2020 रोजी पर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


 या मेळाव्यात रोजगारानिमित्त ऑनलाईन मुलाखती घेण्यासाठी पुणे औद्योगिक परिसरातील एकूण -12 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण 1934 रिक्तपदे कौशल्य विकास व रोजगार विभागाला कळविण्यात आलेली आहेत. नोवेल कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे ओढावलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळावा व मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपलब्ध रिक्तपदांसाठी दहावी पेक्षा कमी शिक्षण असणारे तसेच इ.10 वी, 12 वी कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय, डिप्लोमा होल्डर व इंजिनिअरिंग अशा सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. एम्लॉयमेंट कार्यालयाकडे ऑनलाईन नाव नोंदणी केलेले सर्व उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल त्यांनी राज्य शासनाच्या WWW.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर जावुन आपली नविन नोंदणी करु शकता व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण ऑनलाईन अर्ज करु शकता,असे आवाहन विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र,पुणेचे सहाय्य्क आयुक्त् वि.वि.कानिटकर यांनी केले आहे.


  


                                    0 0 0 0.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image