*महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही* - *उपमुख्यमंत्री अजित पवार*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 मुंबई, दि. 15 :- “भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी संपूर्ण कारकिर्दित त्यांने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही. धोनीचं यष्टीरक्षण, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याचा संयम, आव्हानात्मक परिस्थितीतला आत्मविश्वास, मैदानात ‘कॅप्टन कूल’ म्हणून वावरणं, त्याने देशाला जिंकून दिलेला विश्वचषक हे सारं नेहमीच आनंद देत राहील. धोनीने भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. युवा खेळाडूंसाठी, नव्या पिढीसाठी महेंद्रसिंह धोनी हे नाव नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील. धोनीच्या पुढील वाटचालीसाठी, कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा..” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेंद्रसिंह धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहिर केलेला भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यालाही उपमुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


०००००