पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच मिलिंद सामाजिक व क्रीडा मंडळाच्या वर्धापनदिनाच्यानिमित्ताने ध्वजारोहण सोहळा मंडळाचे मार्गदर्शक राजेश गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेऊन पार पाडण्यात आला.
तसेच मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुला - मुलींचा प्रशस्तीपत्रक व वृक्ष देऊन मिलिंद सामाजिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रलय हर्षवर्धन धिवार यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मिलिंद सामाजिक व क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष सागर म्हस्के , कार्याध्यक्ष सोमेश कांबळे , सरचिटणीस अभिषेक वाघमारे , खजिनदार अनुराग भोसले , हिशोबतपासनीस अविष्कार भोसले , प्रज्वल पोळ , सुजित म्हस्के माजी अध्यक्ष निखिल गायकवाड , रुपेश उग्राल , संतान मेंडिस व हर्षवर्धन धिवार आदी उपस्थित होते .