खडकी छावणीचे मा. उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांचे निधन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


  


*खडकी :-* खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सुरेश कांबळे (५८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात २ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. कांबळे यांच्या मृत्यूमुळे खडकी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट कायद्याचे गाडे अभ्यासक


अशी त्यांची ओळख होती. कांबळे हे १९९७,२००८ आणि २०१५ असे ३ वेळा बोर्डाचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी खडकी छावणी उपाध्यक्ष पद ही भूषविले आहे. खडकी सराफ अॅण्ड मनीलेंडर असोसिएशन तसेच अडत व्यापारी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.


खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील खुप अभ्यासू सदस्य म्हणून आजवर त्यांची ओळख आहे. सर्व स्तरातील नागरिकांना सुरेख कांबळे हे जवळचे होते.खडकीचे महात्मा गांधी अशी ओळख सुरेख कांबळे यांची होती. सुरेशभाऊ कांबळे यांचे असे जाणे सर्वाना चटका लावून गेली.


 


 


🌺💐🌻🌷🙏🙏🙏🙏


पुणे प्रवाह न्युज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


🌺🌻🌸🌹🙏🙏🙏🙏