अखिल वारकरी संघटना *परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.वारकरी समाज भुषण कृष्णानंद महाराज आवटे यांची निवड*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  परभणी / प्रतिनिधी


.............


अखिल वारकरी संघाच्या परभणी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी श्री.कृष्णानंद महाराज आवटे कुंडी ता.सेलु जि.परभणी येथील अभ्यासु हरिभक्त आवटे महाराज यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिव हभप संजय महाराज हिवराळे यांनी राज्य अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज धानोपकर पाटील पांडुरंग महाराज शितोळे बाबा यांच्या सहमतीने केली आहे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. 


ह.भ.प कृष्णानंद महाराज आवटे यांना गेले अनेक वर्षे वारकरी संप्रदायाचे चे तरूण वयात अभ्यासपूर्ण उत्कृष्ट कार्य केले गोरगरिबांना अन्नदान,वस्रदान,वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन अनाथ मुलांना ज्ञानदान केले केल्याबद्दल ज्येष्ठ हरिभक्त मंडळी कडुन गौरविण्यात आले आहे. 


परभणी सह राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. आता अखिल वारकरी संघ परभणी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर श्री.दादासाहेब कारंडे सर श्री.शामजी महाराज राठोड श्री.भागवताचार्य दशरथ महाराज अंभोरे श्री.गजानन महाराज देठे श्री.दिलिप महाराज माहाडिक श्री.प्रदिप महाराज रोडे श्री.गोरख महाराज तुपे श्री.गहिनीनाथ महाराज काटे श्री.सागर महाराज देहाडराय श्री.रामदास महाराज बामणे श्री.वाघेश्वर महाराज तळेकर श्री.गोपाल महाराज देव्हडे श्री.पांडुरंग महाराज देव्हडे आणि सर्व मित्र परिवारांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र मध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे व स्वागत केले जात आहे.