श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


 पुणे, दि. 22 – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना शनिवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी सुरज तांबे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर विश्वस्त मिलिंद सातव, सुरज रेणुसे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा भाऊसाहेब रंगारी गणपतीला आकर्षक आणि इको फ्रेंडली बांबूची सजावट करण्यात आलेली आहे. दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. बाप्पाचे दर्शन भाविकांना www.bhaurangari.com या वेबसाइटवर घेता येणार आहे. तसेच पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक मोहोत्सवाची मेजवानी गणेशभक्तांनी दररोज सायंकाळी 7 वाजता www.bhaurangari.com या वेबसाईटवर आणि दुपारी 3.30 वाजाता एबीपी माझावर अनुभवावी असे आवाहन उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले आहे.