उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे  ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे 


ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन


 


                   पुणे दि. 18 : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवडच्या वतीने देण्यात आलेल्या 31 मार्च 2020 ते 12 जून 2020 या कालावधीतील संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-या अर्जदारांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. 


                  तथापि 31 मार्च 2020 ते 12 जून 2020 या कालावधीमधील दिनांक 31 मार्च व 1 एप्रिल 2020 करीता अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता दिनांक 23 ऑगस्ट 2020 रोजी तर 3 व 4 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी 29 ऑगस्ट 2020, 7 व 8 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 30 ऑगस्ट 2020, 9 व 13 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 5 सप्टेंबर 2020, 15 व 16 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 6 सप्टेंबर 2020, 17, 18 व 20 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 12 सप्टेंबर 2020, 21,22 व 23 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 13 सप्टेंबर 2020, 24,27 व 28 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 19 सप्टेंबर 2020, 29 व 30 एप्रिल 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 20 सप्टेंबर 2020, 4,5,6,8 11 व 12 मे 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 29 सप्टेंबर 2020 तर 13 मे ते 12 जून 2020 रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता 27 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये उपस्थित रहावे. 


 या चाचणीकरीता येताना सर्व उमेदवारांनी चेह-यावर मास्क व हँड ग्लोव्हज घालणे बंधनकारक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी. पिंपरी चिंचवड, पुणे यांनी कळविले आहे.      


 


     0 0 0 0