पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बालकलाकारांनी वेशभूषेत येऊन केला रामनामाचा जयघोष
पुणे : बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येत श्रीराम मंदिर भूमीपूजनानिमित्त पुण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्यक्ष श्रीराम आणि रामाचे परमभक्त हनुमान यांच्या वेशभुषेत बालकलाकारांनी मंदिरात आगमन करीत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तसेच रामकथेतील काही प्रसंग देखील कलाकारांनी सादर केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह आणि कार्यकर्ते उपस्थित होते.