आयफॉल्कनद्वारे क्यूएलइडी आणि यूएचडी टीव्हीची नवी श्रेणी सादर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, ६ ऑगस्ट २०२०: टीसीएलचा सब ब्रँड ऑयफॉल्कनने आपले नवीन क्यूएलईडी आणि यूएचडी टीव्ही आणले आहेत. एच ७१ आणि के ७१ हे मॉडेल फक्त फ्लिपकार्टवर अनुक्रमे ४९,९९९ रुपये आणि २५,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच पहिल्या २५० ग्राहकांना फ्लिपकार्टच्या काही विशेष बँकिंग ऑफरसह १ वर्षाचे सोनी लाइव्ह सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. दोन्ही मॉडेलमध्ये हँड्सफ्री व्हॉइस कंट्रोल चा समावेश आहे. फार फील्ड व्हॉइस कंट्रोलसह, यूझर्स टीव्ही कंट्रोल करू शकतात, रिमाइंडर्स सेट करू शकतात आणि ब-याच गोष्टी पूर्णपणे हँड्सफ्री करू शकतात.


 


आणखी एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे मायक्रो डिमिंग. वर्धित आणि अनुकुलित एलईडी पाहण्याच्या अनुभवासाठी स्क्रीनचा विशिष्ट भाग अंधुक करण्यासाठी डिझाइन केला असून उर्वरीत भाग अधिक ब्राइट दिसतो. दोन्हीडी डिव्हाइस अँड्रॉइड पी, अँड्रॉइड ऑरेटिंग सिस्टिम (ओएस)ची दुसरी आवृत्तीसह येतात. यासह यूझर्सना गूगल प्ले स्टोअरवरून ५००० पेक्षा जास्त मनोरंजनाच्या मोठ्या खजिन्यात प्रवेश मिळतो, हादेखील मोठा फायदा आहे.


 


टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले, “ आयफॉल्कनमध्ये आम्ही प्रेक्षकांचा पाहण्याचा अनुभव आणि त्यांची मनोरंजनाची पातळी आणखी समृद्ध करण्यासाठी टीव्ही बनवण्याचा प्रयत्न करत असतो. हे टीव्ही मॉडेल्स बनवताना, आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करता यूझर्सना ते कसे परवडतील, यावरही भर देतो. त्यामुळेच आमचे सर्व टीव्ही ग्राहकांच्या बजेटवर परिणाम न करणाऱ्या किंमतीत येतात. किंबहुना त्यापेक्षा कमी किंमतीत ऑफर देतात. याच तत्त्वानुसा, आमचे दोन नवे टीव्ही बनवण्ययात आले आहेत.