संग्राम शेवाळे यांनी वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**संग्राम शेवाळे यांनी वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा .**


 


  पुणे:संग्राम नाथाभाऊ शेवाळे हे जनता दल (से) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रदेशाध्यक्ष आहेत.आणि देशाचे माजी पंतप्रधान मा.एच.डी.देवेगौडा यांचे एकदम जवळचे निटवर्तीय मानले जातात.यांचा वाढदिवस १३ ऑगस्टला असतो.पण त्यांनी या वर्षी त्यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला कारण त्यांच्या कुटूंबाच्या आधारवड त्यांच्या आजी मागील काही दिवसात त्यांचे निधन झाले आहे.आणि दुसरे म्हणजे आपल्यावर आलेले कोरोनाचे संकट त्यामुळे त्यांनी यंदा कुठेही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा खर्च टाळून त्यांनी १ ली ते १० वी अश्या दोन गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलेला आहे.आणि येत्या १५ ऑगस्टला ते निसर्गचक्री वादळामुळे दापोली तालुक्यात शैक्षणिक खूप नुकसान झाले आहे.त्यामुळे शेवाळे हे १००० वही दापोली तहसीलदार मॅडम यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.आशा पध्दतीने त्यांनी सर्व पदाधिकारी यांना कुठेही वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या काळात विधायक काम करण्यास सांगितले अशा पद्धतीने त्यांनी वाढदिवस साजरा केला.