कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरुन दर्शन घेतले. रुद्रयाग व हवन यशोधन शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते पार पडला धार्मिक विधी .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


श्रावणी सोमवार निमित्त दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या प्रतिकृतीची आरास-


बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ; लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी घेतले बाहेरुन दर्शन ; पार पडले धार्मिक विधी


 


पुणे : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या भव्य प्रतिकृतीची आरास करण्यात आली. बेलाची पाने आणि विविधरंगी फुलांनी मंदिराचा गाभारा व सभामंडप सजविण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाहेरुनच दर्शन घेतले, तसेच मंदिरात केवळ धार्मिक विधी पार पडले. 


 


यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त अंकुश काकडे यांसह कर्मचारी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे. मंदिरात रुद्रयाग व हवन यशोधन शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते पार पडला. पूजेला १००८ बिल्वपत्र अर्पण करण्यात आली.


 


ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी बेलाच्या पानांची ही आकर्षक आरास करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी देखील पार पडले. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, याकरीता प्रार्थना करण्यात आली.


 


* फोटो ओळ : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या भव्य प्रतिकृतीची आरास करण्यात आली.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image