संतोष पाटील यांचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड :

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


संतोष पाटील यांचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड :



पुणे :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल येथील कार्यरत शिक्षक तथा व्याख्याते संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड नोंदविला . इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला . संतोष पाटील यांनी सर्वात जास्त प्लेज एका तासात घेण्याचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड केला . त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्लेज घेतल्या .याच बरोबर त्यांनी कोरोना योध्याचे ई सर्टिफिकेट एका तासात सर्वात जास्त मिळविले . यात त्यांनी कोरोना प्लेज राष्ट्रीय एकता प्लेज अशा विभिन्न प्रकारच्या प्लेज घेतल्यास . त्यांनी चोवीस प्लेज सर्टिफिकेट व वीस कोरोना योद्धा सर्टिफिकेट मिळविले .हा रेकॉर्ड त्यांनी एका तासात आपल्या नावे केला . लॉक डाउन काळाच्या काळातील सदुपयोग त्यांनी केला . या आधी त्यांनी ओएमजीचा राष्ट्रीय रेकॉर्ड आपल्या नावे केलेला आहे . ते सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक आहेत . ते आपल्या व्याख्यानाचे मानधन विभिन्न अनाथालयास व वृद्धाश्रमास देतात . यासाठी त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत . इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड करून त्यांनी नवा कीर्तिमान प्रस्थापित केला . यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .