सीमेवरील जवानांना पुणेकरांतर्फे १००१ राख्या

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम : आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतीय बनावटीच्या राख्या


 


पुणे : आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आत्मनिर्भर भारत अंतर्गत योगदान म्हणून चिनी राख्यांना दूर ठेवून भारतीय बनावटीच्या १००१ चॉकलेट राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. मुख्य डाक घर, पुणे ( जी पी ओ) येथून राख्या पाठविण्यात आल्या. 


 


यावेळी सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहायक धर्मदाय आयुक्त राहुल चव्हाण, पोस्ट मास्तर जनरल बी.पी. एरंडे, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, अखिल झांझले, सारंग सराफ, विक्रम मूर्ती यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पंडित वसंतराव गाडगीळ तसेच जम्मू स्थित जनरल जोरावर सिंह मेमोरीयल ट्रस्टच्या दीक्षा कलुरीया हे आॅनलाईन सहभागी झाले होते.     


 


दिलीप देशमुख म्हणाले, चीनसोबत सध्या सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आपले जवान सीमेवर सदैव तैनात आहेत. त्यांना पाठविलेल्या या राख्या म्हणजे संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश आहे. 


 


पोस्ट मास्तर जनरल बी.पी. एरंडे म्हणाले, टपाल खाते हे कोरोना काळात देखील जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत होते. तसेच सीमेवरील जवानांसाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने राख्या पोचविण्यात देखील टपाल खाते अभिमानाने सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. 


 


सीमेवरील जवानांना पुण्यातील राख्या प्रत्यक्ष पोचविण्याचे काम जनरल जोरावर सिंह मेमोरीयल ट्रस्ट या वर्षी देखील मोठ्या जबाबदारीने पार पाडणार असल्याचे दीक्षा कलुरीया यांनी सांगितले. पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांनी उपक्रमाला शुभाशीर्वाद दिले.


 


*फोटो ओळ : आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने मुख्य डाक घर, पुणे ( जी पी ओ) येथून भारतीय बनावटीच्या १००१ चॉकलेट राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या.


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image