माईर्स एमआयटीचे प्रशासकीय अधिकारी शरद रामचंद्र देशपांडे यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे, दिः 6 जुलैः माईर्स एमआयटीचे प्रशासकीय अधिकारी शरद रामचंद्र देशपांडे यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 1996 साली माईर्स एमआयटीच्या प्रशासन विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून ते रुजू झाले. गेली 26 वर्षापासून त्यांनी या विभागात आपली सेवा दिली आहे. इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभूत्व होते. माईर्स एमआयटी या संस्थेच्या विविध सभेचे इतिवृत्त उत्तम रित्या तयार करीत असत. तसेच, संस्थेचे पत्रव्यवहार उत्तम रित्या करीत होते.


माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व उपाध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी शरद रामचंद्र देशपांडे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, एक कुशल प्रशासक आमच्या संस्थेने गमविला आहे. त्यांच्या निधनामुळे आमच्या संस्थेची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच परमेश्वराकडे प्रार्थना.


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, बुद्धिवान व कुशल प्रशासक आज आमच्यामध्ये नाही यांची खंत आहे. ते अतिशय कष्टाळू व मनमिळावू स्वभावाचे होते. संस्थीेमधील सर्व कर्मचार्‍यांवर त्यांचे नितांत प्रेम होते. ते सदैव आमचे मार्गदर्शक होते.


माईर्स एमआयटीचे विश्वस्त, संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शरद रामचंद्र देशपांडे यांना श्रध्दांजली वाहिली.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image