कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची नियुक्ती - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 



 


पुणे दि.6 : - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) या सर्व क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी करणा-या शासकीय तसेच खाजगी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. या लॅबमध्ये कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीतील कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूबाबत ज्या पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणा-या सर्व व्यक्तींना शोधून काढणे व आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्याकडे कोविड-19 विषाणू बाधित सर्व रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आवश्यक असून रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. तसेच रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणा-या बेडबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी व डॅशबोर्डचे संनियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. तसेच हॉस्पिटलमधील बेडचे सुयोग्य पध्दतीने नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषि आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी काम करीत आहेत. परंतु त्यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पध्दतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image