संत नामदेव महाराजांचा ६७० वा संजीवन समाधी सोहळा रद्द नामदेव समाजोन्नती परिषदेचा निर्णय : नामदीप लावून घरच्या घरी सोहळा साजरा करण्याचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


संत नामदेव महाराजांचा ६७० वा संजीवन समाधी सोहळा रद्द


नामदेव समाजोन्नती परिषदेचा निर्णय : नामदीप लावून घरच्या घरी सोहळा साजरा करण्याचे आवाहन 


 


पुणे : श्री संत नामदेव महाराजांचा ६७० वा संजीवनी समाधी सोहळा शनिवार दिनांक १८ जुलै आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूभार्वामुळे पुन्हा लॉकडॉन जाहीर झाला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुणे शहरातील विविध ज्ञातीसंस्थांना श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा सार्वजनिक रित्या साजरा करता येणार नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपल्या घरी राहूनच साधेपणाने नामदेव महाराजांच्या प्रतिमेसमोर नामदिप लावून समाधी सोहळा साजरा करावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेचे शहराध्यक्ष संदीप लचके व मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते यांनी केले आहे


.


नुकत्याच जाहीर झालेल्या नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर कार्यकारिणीच्या समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ, कसबा पेठ, पुणे येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष प्रदीप खोले, रणजीत माळवदे, कुंदन गोरटे, विशाल पोरे, खजिनदार अक्षय मांढरे, पदाधिकारी व सदस्य यांनी हा निर्णय सवार्नुमते घेतला असून या बैठकीला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून पुणे शहरातील पदाधिकारी हजर होते. 


 


कोरोना काळात घरीच रहा व स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेवून सरकारला सहकार्य करा असे आवाहन सचिव सुभाष वासुदेव मुळे यांनी केले. मोहन खटावकर यांनी सूत्रसंचालन केले तर सागर मांढरे यांनी आभार मानले.