पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या पतीनं आत्महत्या केली आहे.
'खुलता खळी खुलेना' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आशुतोषनं राहत्या घरी गळफास घेतला असून या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आशुतोषच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही. काही दिवसांपूर्वी आशुतोषनं आत्महत्येसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत माणूस आत्महत्येचं पाऊल का उचललो याबद्दल सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आशुतोषनं हे पाऊल उचलल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. आहे. २० जानेवारी २०१६ रोजी मयुरी विवाहबद्ध झाली होती.