माझा वेगळा मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


डॉक्टर कार्तिकचं लग्न दीपाशी होणार की श्वेताशी?


स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा १३ जुलैपासून ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तेही नव्या ट्विस्टसोबत. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरु आहे. पण दीपा आणि दीपाची बहिण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या, श्वेता आणि राधाई यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दीपाऐवजी श्वेताचं लग्न कार्तिकशी व्हावं म्हणून सौंदर्याने प्लॅनही आखलाय. यासाठी दीपा आणि श्वेताचा लग्नातला ड्रेस अगदी सारखा ठरवण्यात आलाय. आता ऐन मुहूर्तावेळी दीपाऐवजी श्वेता लग्नासाठी उभी रहाणार अशी परिस्थीती निर्माण झालीय. त्यामुळे कार्तिकचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची उत्सुकता आहे


अत्यंत उत्कंठावर्धक असे रंग माझा वेगळाचे पुढील भाग असणार आहेत. तेव्हा लग्नातला हा मोठा ट्विस्ट पहाण्यासाठी नक्की पाहा रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर