ॲपद्वारे सुरक्षित ट्रेडिंग सुनिश्चित करण्याचे ५ मार्गॲपद्वारे सुरक्षित ट्रेडिंग सुनिश्चित करण्याचे ५ मार्ग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ॲपद्वारे सुरक्षित ट्रेडिंग सुनिश्चित करण्याचे ५ मार्ग


(सौजन्य : एंजल ब्रोकिंग)


 


कोरोना व्हायरस आता औपचारिकदृष्ट्या आपल्या दैनंदिन संवादातील एक भाग बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेपासून आपल्या सार्वजनिक जीवनापर्यंत या विषाणूने जवळपास सर्वकाही रोखून धरले आहे. आपला दिवस कसा बसा डिजिटल उपकरणांद्वारे निघतोय, विशेषत: आपल्या स्मार्टफोनवरच निघतोय. स्मार्टफोनने आपल्याला मित्र आणि नातेवाईकांशी जोडलेले आहे तसेच व्यापार आणि गुंतवणुकीसह दैनंदिन गरजांसाठी तंत्रज्ञान प्रणित उपायांसह आपल्याला सशक्त बनवले आहे. त्यामुळे आपण ऑल न्यू डिजिटल ट्रेडिंग अवतारासाठी सज्ज होत आहोत. याच धर्तीवर आपल्या स्मार्टफोनद्वारे सुरक्षित व्यापार करण्याची सुनिश्चिती केली पाहिजे.


 


१. आपले लॉगिन क्रेडेन्शिअल्स शेअर करू नका: आपले लॉगिन क्रिडेन्शिअल कुणाशीही शेअर करू नका. हे थोडे बंधनकारक वाटू शकते, मात्र अनेक ट्रेडर आपले लॉगिन क्रेडेन्शिअल हलकेच घेतात, असे दिसून आले आहे. लक्षात ठेवा, ब्रोकर किंवा तुमची बँक (कोणतीही) कधीच तुमच्याकडून ट्रेडिंग आयडी आणि पासवर्ड मागणार नाही. कुणी ही माहिती देण्याची विनंती केली तर तत्काळ याची माहिती सर्व्हिस प्रोव्हायडरसोबतच पोलिसांना द्या. तसेच आपले क्रेडेन्शिअल्स् कुणी पाहू शकेल, अशा ठिकाणी लिहिणे किंवा सेव्ह करणे टाळा. आपल्याला डिजिटल आणि भौतिक जगात आपल्या खात्याच्या ऑलराउंड सुरक्षेची सुनिश्चिती करावी लागेल.


 


२. आपली पासवर्ड सुरक्षा वाढवा: आपल्या ट्रेडिंग खात्यासाठी कमकुवत पासवर्ड ठेवणे टाळा. कारण सायबर हल्लेखोर तो सहज शोधू शकतो. अल्फान्यूमरिक पासवर्डचा उपयोग करून आपल्या खात्यासाठी उच्च प्रकारच्या सुरक्षेची हमी देऊ शकते. अर्थात, वित्तीय सेवा प्रदाता सध्या स्वत:हूनच अल्फान्यूमरिक पासवर्ड अनिवार्य करतात. त्यांनी असे केले नाही तरी तुमच्याकडून खबरदारी बाळगा. आपले नाव, जन्म तारखेचा मेळ असलेला सरळ पासवर्ड कधीही वापरू नका. सर्जनशील बना.


 


३. रुटकिट इन्स्टॉलेशन कधीही ठेवू नका: बहुतांश वेळा पेड अॅप्लिकेशनचे मोफत ओव्हर-द-काउंटर व्हर्जन मिळाल्यास ते आकर्षक वाटू शकते. मात्र हा विषय स्टॉक ट्रेडिंगचा असल्यामुळे एखादी डील खूपच अविश्वसनीय वाटत असेल तर ती कधीही खरी नसणार. अशा प्रकारच्या ओव्हर-द-काउंटर व्हर्जनमध्ये अॅप्लिकेशन-लेव्हल मालवेअर (एक नुकसानकारक प्रोग्राम) असते किंवा ते रुटकिट लेव्हलवर तैनात केलेले असते. कोणत्याही स्थितीत असे अॅप्लिकेशन आपल्या फोनच्या सुरक्षेची भिंत तोडून आपली क्रेडिट आणि इतर संवेदनशील माहिती सहजपणे काढू शकतात. अखेरीस, असे अॅप इन्स्टॉल केल्यास पैसा कमी वाचतो आणि नुकसानच जास्त होते. त्यामुळे हे टाळले पाहिजे. तुम्ही हे केले असेल तर तुम्ही तुमचे डिव्हाइस फॅक्टरी डिफॉल्टवर रीस्टोअर केले आहे का, हे पहा.


 


४. सार्वजनिक ठिकाणी लॉगिन करणे टाळा: तुम्ही कधीही सार्वजनिक ठिकाणी खाते सुरू केले तर एखादी व्यक्ती वाकून तुमचा पासवर्ड पाहू शकण्याची शक्यता आहे. आपण टाइप करत असलेल्या कीबोर्डवरून हे सहज लक्षात येते. त्यामुळे तुमचा अल्फान्यूमरिक पासवर्डदेखील निरर्थक होतो. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोफत हॉटस्पॉटचा वापर करणे टाळा. कारण आपल्या डिव्हाइसला सायबर धोक्यांप्रति अधिक संवेदनशील बनवतात.


 


५. प्रत्येक ट्रेड सुरक्षित करा: ट्रेडिंग करताना बाजार वारंवार अस्थिर होत असतो. कोव्हिड-१९ नंतर तर बाजार नेहमीच अशा प्रकारचा ट्रेडिंग पॅटर्न दर्शवत आहे. अस्थिर काळात आपला प्लॅटफॉर्म मजबूत टेक्नोलॉजीकल इन्फ्रास्ट्रक्चरने सपोर्टेड नसेल तर डायनॅमिक लोड आपल्या प्लॅटफॉर्मला धोका पोहचवू शकतो. अशा प्रकरणी आपण आपले ट्रेडिंग पूर्ण करू शकणार नाहीत. तसेच आपले काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमीच सर्व ट्रेड्सना सुरक्षित ठेवू शकणा-या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म/मोबाइल अॅपवर विश्वास ठेवला पाहिजे. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर स्वत: नोंदणी करण्यापूर्वी त्यासंबंधी पूर्णपणे माहिती करून घेतली पाहिजे. तंत्रज्ञानविषयक त्रुटींसाठी ओळखल्या जाणा-या प्लॅटफॉर्मचा वापर करणे टाळा.


 


अशा प्रकारे, काही सोप्या नियमांचे पालन करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित रुपाने ट्रेडिंग कर शकाल आणि तुमच्या मेहनतीची कमाईही व्यर्थ जाणार नाही. कारण बचतीचा एक रुपयादेखील तुमचीच कमाई आहे.


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image