आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे लवकर मागणी करणार..... प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे


पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


**प्रेस नोट**


आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे लवकर मागणी करणार.... प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे


 


 


पुणे :- महाराष्ट्र राज्य आज कोरोनाच्या महा संकटाशी झुंज देत आहे.यावेळी सरकार यंत्रांबरोबर सामाजिक काम करणाऱ्या चळवळी यामध्ये उतरल्या आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे पण प्रशिक्षण न घेता काम करता धोक्याचे ठरू शकते.यामध्ये काम करत असताना कुशल आणि सक्षम लोक हवेत.यामुळे सरकार यंत्रणेचा ताण आणि दबाव कमी होईल.आणि अशा वेळी काम करताना सोपे होईल यासाठी सावित्रीबाई फुले विद्यपीठ पुणे यांनी हा अभ्यासक्रम चालू करण्यात यावा अशी मागणी जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे करणार आहेत. त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. उदा. महाराष्ट्रात भूकंप,महापूर,वादळ या सारख्या आपत्ती अचानक येतात तेव्हा या अभ्यासक्रमाचा फायदा होऊ शकतो.अशा वेळी सरकार यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो.जिल्हा व्यवस्थापन कार्यालय आणि एनडीआरएफशी संलग्न ठेऊन साधनसामग्री उपलब्ध ठेऊन यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.त्यामुळे महाविद्यालयान पातळीवर एक सक्षम टीम उपलब्ध राहील.त्यामुळे विद्यपीठाने हा अभ्यासक्रम चालू करण्यात आला तर खूप हितकारक ठरू शकते आणि संकटाच्या काळात फायद्याचे होणार आहे. दरवर्षी विद्यपीठा अंतर्गत 1000 विद्यार्थी ही पदवी घेऊन बाहेर पडले तर खूप फायदा होऊ शकतो.आणि विद्यपीठांतर्गत सगळीकडे याचे उपकेंद्रे चालू करण्यात आली तर अजून चांगले होईल. यामुळे समाजावर जे संकट येते त्यावेळी याचा खूप फायदा होणार आहे. महत्वाचे ते स्वतःचे सरंक्षण करू शकतील असे मला वाटते.या अभ्यासक्रमाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला जात आहे. आणि पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यपीठ असून तिथे वेगवेगळ्या आणि नवीन योजना,अभ्यासक्रम चालू करण्यात येतात. त्यामुळे या मागणीचे पण ते स्वागत करून हा अभ्यासक्रम चालू करतील अशी मला आशा आहे. अशी मी जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करणार आहे.असे त्यांनी सांगितले. आपला, मा. संग्राम शेवाळे.