आयफॉल्कन क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी आणण्याच्या तयारीत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


~हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल, क्वांटम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी ऑडियोसारख्या उत्कृष्ट सुविधांचा समावेश ~


 


मुंबई, २८ जुलै २०२०: टीसीएल कंपनीचा ब्रँड आयफॉल्कन हा लवकरच क्यूएलईडी आणि ४के अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही मालिकेतील एच७१ आणि के७१ ही दोन उत्पादने लाँच करणार आहे. ग्राहकांना उत्कृष्ट स्टाइल, परफॉर्मन्स आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपयुक्त किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या तत्त्वानुसार ही उत्पादने लाँच केली जाणार आहेत.


 


एच७१ क्यूएलईडी मॉडेलमध्ये स्मार्ट टीव्ही सेगमेंटचे काही उत्कृष्ट फीचर आणि टेक्नोलॉजी पहायला मिळेल. या डिव्हाइसला व्हॉइस कमांड्सद्वारे ऑपरेट करण्यासाठी हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल, पाहण्याच्या मस्त अनुभवासाठी क्वांटम डॉट टेक्नोलॉजी, ऑटोमॅटिक ब्राइटनेस अॅडजस्ट करण्यासाठी मायक्रो डिमिंग टेक्नोलॉजी तसेच उत्कृष्ट ऑडियोसाठी डॉल्बी ऑडियो सिस्टिम असेल.


 


आतापर्यंत कोणत्याही गोष्टीची अधिकृत खात्री करण्यात आलेली नसली तरीही, इतर फीचर्समध्ये एआय x आयओटी चा समावेश असेल. याद्वारे यूझर टीसीएल स्मार्ट होम डिव्हाइसेसला टीव्हीच्या मदतीने कनेक्ट आणि कंट्रोल करू शकतील. तसेच सर्वोत्तम पिक्चर क्वालिटीसाठी डायनॅमिक टोन मॅपिंगसह एचडीआर व कलर एक्सपान्शन असेल. जे प्रत्येक फ्रेमचा ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन अधिक चांगला बनवेल. डिझाइनच्या बाबतीत सांगायचं तर, ब्रँड क्यूएलईडी टीव्हीला बेझल लेस बनवून फुल स्क्रीन डिझाइनद्वारे सादर करेल. काही रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, या डिव्हाइसला मेटलिक टच देण्यात येईल, ज्याद्वारे केवळ प्रीमियम लुक मिळेल.


 


आयफॉल्कनचे प्रवक्ते म्हणाले, 'आयफॉल्कनमध्ये नेमहीच ग्राहकांना किफायतशीर दरात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सुसज्ज उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. या उत्पादनांमध्ये स्मार्ट टीव्ही सेगमेंटचे काही उत्कृष्ट फीचर आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच हे परवडणा-या किंमतीत उपलब्ध होतील. लवकरच लाँच होणारे क्यूएलईडी रेंजमधील स्मार्ट टीव्ही आपल्याला उत्साही करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.'