भालेराव कुटुंब येतंय तुमच्या भेटीला - २० जुलैपासून नवरी मिळे नवऱ्याला, सोम.-शनि. रात्री ८ वा. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


 


 


भालेराव कुटुंबाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि प्रभाकर, प्रशांत, रवी, उदय ही चार भावंडं सगळ्यांना आपलीशी वाटू लागली. लग्न होतंय की नाही, अशी परिस्थिती असताना रुक्मिणीबाईंचे नवस फळाला आले आणि काटे कुटुंबातल्या चार बहिणींशी चारही भावांची लग्नं एकाच मांडवात झाली. भालेरावांचं घर एकदाचं सुनांनी भरलं आणि रुक्मिणीबाईंचा जीव भांड्यात पडला.


 


 


 


लग्न झालं तर खरं, पण आता चारही संसार सुखानं होतायत की नाही, अशी चिंता रुक्मिणीबाईंना लागून राहिली. भालेराव कुटुंब अजून कोणत्या नवीन अडचणींना तोंड देईल आणि त्यातून कसं बाहेर पडेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे आणि आता या सर्वांची उत्तर घेऊन ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेचे नवीन भाग येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठीवर सुरू होताहेत. 


 


 


 


लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांची आणि भालेराव कुटुंबाची भेट झाली नव्हती, पण आता मात्र मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं असून २० जुलैपासून तुमचं आवडतं भालेराव कुटुंब सगळ्यांच्या भेटीला पुन्हा येतंय. तर मग पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठीवर