४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


 


४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली


 


~ ऑनलाईन लर्निंगमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकण्यात होते सर्वाधिक अडचण ~


 


मुंबई, १६ जुलै २०२०: सध्याच्या ‘स्कूल फ्रॉम होम’च्या स्थितीबद्दल विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शिक्षण मंचाने नुकतेच भारतातील २,१५० पेक्षा जास्त यूझर्समध्ये सर्वेक्षण केले. यातून काही रंजक निष्कर्ष मिळाले.


 


६८.७% ब्रेनली यूझर्सनी मान्य केले की, त्यांनी साथीच्या काळापूर्वी कधीही ऑनलाइन क्लासमध्ये सहभाग नोंदवला नव्हता. आज शिकण्याच्या या लवचिक स्वरुपामुळे सुमारे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. ४४.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की, साथ गेल्यानंतरही ते ‘स्कूल फ्रॉम होम’ संकल्पनेला प्राधान्य देतील. त्यामुळे भारतात साथीनंतरही ऑनलाईन क्लास घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ पाहायला मिळू शकेल.


 


६४.५% विद्यार्थ्यांनी म्हटले की, शिक्षणातील न्यू नॉर्मल आता त्यांना नित्याचे बनले आहे. तथापि, नेटनर्क कनेक्टिव्हिटी भारताच्या वाढत्या ऑनलाइन शिक्षण संस्कृतीत अडथळा ठरू शकते. जवळपास ५९.५% विद्यार्थी म्हणाले की, नेटवर्क कनेक्टिव्हिटी ही स्कूल फ्रॉम होम मॉडेलधील जटील समस्या होती. हीच समस्या तंत्रज्ञान सुविधेबाबतही उभी राहिली का, असे विचारल्यास ५५.९% विद्यार्थ्यांनी नकार दिला.


 


ब्रेनलीने विद्यार्थ्यांना संवादाच्या प्राधान्याविषयीदेखील विचारले. याच चार पर्याय सूचीबद्ध करण्यात आले होते. ते म्हणजे, फोनकॉल, सोेशल मिडीया, मेसेजिंग अॅप आणि ब्रेनलीसारखे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मस. या चौघांनाही जवळपास एक चतुर्थांश (अंदाजे २५%) प्रतिक्रिया मिळाल्या. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन कसे केले, हेही विचारले. ३७.७% विद्यार्थ्यांनी फोन किंवा सोशल मीडियाद्वारे शिक्षकांशी संवाद साधून तर ३०.२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमाद्वारे प्रश्नांची उत्तरे मिळवल्याचे सांगितले. केवळ एका बटणाच्या स्पर्शाद्वारे प्रश्न सोडवण्याच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यी प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी सहसा या प्लॅटफॉर्मकडे वळतात.


 


अखेरीस, या सर्वेक्षणाने हेही दाखवून दिले की, केवळ स्कूल फ्रॉम होम मॉडेल हे आदर्श असू शकत नाही. ३५.८% विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना ऑनलाइन शिकताना समस्या आल्याचा अनुभव घेतला. ३१ टक्के विद्यार्थ्यांना भाषेसाठी हा अडथळा आला तर ५१.९% विद्यार्थ्यांनी गणिते चिडचिड करून सोडवली. त्यामुळे योग्य परिणाम मिळण्यासाठी डिजिटल आणि पारंपरिक शिक्षण या दोन्ही पद्धतींचे संतुलन साधावे लागेल.


 


For further information: Tushar Chavan 9004056574, Value360 Communications.