सिंगिंग स्टार - गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे प्रशांत दामले, बेला शेंडे आणि डॉ. सलील कुलकर्णी करणार परीक्षण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे :- सोनी मराठी वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे म्हणतं ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येकाच्या मनात एक गाणं असत, गाणं गुणगुणऱ्या या ताऱ्यांच्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा हा सोनी मराठी वाहिनीचा प्रयत्न. 


या कार्यक्रमात गाणारे तारे हे काही पेशाने गायक नाहीत पण त्यांना गाण्याची आवड आहे, नेहमीच्या कामातून वेळ काढून गाणं होत नाही, पण त्यांची गाण्याशी नाळ तुटलेली नाही आणि म्हणूनच या मंचावर ते आपल्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न करणार आहेत. 


कार्यक्रमाचं सूत्र संचलन करण्याची जबाबदारी पार पडायला महाराष्ट्राचा लाडका आणि ग्लॅमरस असा चेहरा म्हणजे ऋता दुर्गुळे हिची निवड करण्यात आली. 


या कार्यक्रमचे परीक्षक म्हणून ज्यांचं लिमका बुक रेकॉर्ड्स मध्ये नाव असलेले, स्वतः उत्तम गायक,अभिनेते व निर्माते असलेले प्रशांत दामले, स्वतःच्या गोड आवाजाने अनेक अभिनेत्रींना आवाज दिलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती बेला शेंडे आहे, आणि गीतकार-गायक ज्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या 'आयुष्यत' आपलं असं स्थान निर्माण केलं आहे असे डॉ. सलील कुलकर्णी असतील यांची निवड गेली.


सर्व ताऱ्यांना गाणे शिकवण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी संगीतात निपुण असेलेले काही मार्गदर्शक निवडले गेले आणि तारे आणि मार्गदर्शक अशा जोड्या करण्यात आल्या. प्रेक्षकांचे अनेक लाडके तारे आणि गायक २१ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


सोनी मराठी वाहिनीचा हा पहिलाच सिंगिंग शो आहे आणि एका वेगळ्या पण दर्जेदार संकल्पना घेऊन सोनी मराठी वाहिनी 'सिंगिंग स्टार' हा कर्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image