मंडई गणपतीची १२७ वर्षात प्रथमच होणार मंदिरात प्रतिष्ठापना-

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे :- अखिल मंडई मंडळाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ; इतर मंडळांनी अनुकरण करण्याचे आवाहन


 


पुणे : पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे. मंडळाच्या शारदा गजाननाची गेल्या १२७ वर्षांत यावर्षीच्या गणेशोत्सवात प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट आदी उपस्थित होते.


अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे १२५ वे वर्ष देखील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. परंतु पुण्यात कोरोनामुळे वाढणा-या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे.  


गणेशोत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलविण्यात येणार नाही. मंदिरातच सर्व धार्मिक विधी साजरे केले जाणार आहेत. यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने पुणेकर आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. यावेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अखिल मंडई मंडळाच्या अनेक चांगल्या उपक्रमांचे अनुकरण पुण्यातील इतर मंडळे करतात. त्यामुळे यंदाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आले आहे.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image