पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा यंदा देखील कायम असून यावर्षी सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मार्च २०२० च्या १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.६५% एवढा लागला असून विज्ञान शाखेचा निकाल ९९.१३ % आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९७.०५ % लागला.
विज्ञान शाखेतून हर्ष अन्वेकर हा विद्यार्थी ९३.०७ % गुण मिळवून प्रथम आला तर वाणिज्य शाखेतून अथर्व मेहता ९३.०० % गुण मिळवून प्रथम आला. विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे, कार्याध्यक्ष डॉ.अ.ल. देशमुख, कार्यवाह गीता देडगावकर यांनी मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे - १) हर्ष अन्वेकर - ९३.०७ टक्के २) प्रांजल रसाळ - ९२.३० टक्के ३) मृणाली आढळ - ९२.१५ टक्के ४) साहिल कंधारे- ९१.२३ टक्के ५) दिलनाज अत्तार - ९०.१५ टक्के
*वाणिज्य शाखेचा निकाल - १)अथर्व मेहता - ९३.०० टक्के २) प्रद्युम्न गायकवाड - ९१.०० टक्के ३) सिमरन ढोका- ९०.०० टक्के
*फोटो ओळ - विज्ञान शाखेत प्रथम हर्ष अन्वेकर आणि वाणिज्य शाखेत प्रथम अथर्व मेहता