आयसीएआय'तर्फे आयोजित शिबिरात १८८ जणांचे रक्तदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आयसीएआय'तर्फे आयोजित शिबिरात १८८ जणांचे रक्तदान


 पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात १८८ जणांनी रक्तदान केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजिले होते. २८ जून ते ४ जुलै या चार दिवशी शहराच्या विविध भागात हे रक्तदान शिबीर झाले.


 


फडके संकुल (टिळक रोड), आयसीएआय भवन (बिबवेवाडी), डीएमकेएच (बाणेर-पाषाण लिंक रस्ता), एसपीसीएम (मित्र मंडळ चौक), इंटरलिंक कॅपिटल अड्वायझर्स (केके मार्केट), ई-अर्थ अकाउंट फायनान्स अँड मॅनेजमेंट कन्सल्टन्ट प्रा. लिमिटेड व राठी अँड राठी कंपनी (सिंहगड रस्ता), एसएनजे अँड कंपनी (एरंडवना) येथे आयोजित रक्तदान शिबिराला सीए सभासद व नागरिकांनी प्रतिसाद आला.सीए स्थापना दिवसानिमित्त सीए सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 


 


माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. नगरसेवक जयंत भावे, 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, 'आयसीएआय' पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, माजी अध्यक्ष सीए ऋता चितळे, सीए सर्वेश जोशी आदी प्रत्येक उपक्रमावेळी उपस्थित होते. सीए सचिन मनियार यांनी शिबिराचे समन्वयन केले.