तुळशीबाग व्यापाºयांच्या पुढाकाराने उजळली कोकणातील वाडी तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने कोकणातील हरिहरेश्वर येथे सौर दिव्यांचे वाटप पुणे : चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला बसलेला तडाखा आणि कोरोनामुळे कोकणवासीयांचे जीवन अजून बिकट झाले. कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील साक्षीभैरवी हे गाव पण ह्या तडाख्यातून सुटले नाही. अशा परिस्थितीत विजेचे खांब कोलमडून पडले. त्यामुळे संपूर्ण गाव गेले महिनाभर अंधारातच होते. अशावेळी तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने गावातील १०० कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. व्यापाºयांनी प्रत्यक्ष जाऊन मदतकार्य केले. तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे नितीन पंडीत, मोहनशेठ साखरीया, रामदास तुळशीबागवाले, किरण चौहान, निकेत देसाई, जितेंद्र अंबासनकर, चेतन कावरे, संदेश जव्हेरी गणेश रामलिंग, किरण सावंत, राजेश शिंदे, पिंटूशेठ बिरादर तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, दत्ता भाऊ कावरे यांनी पुढाकार घेतला. या गावातील १०० कुटुंबांना सौर दिवे, धान्याचे कीट, गव्हाचे पीठ, चटई, बिस्किटे,साबण,सॅनिटायझर ,मेणबत्ती काडेपेटी,डासांची उदबत्ती आदी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. आपल्या वाडीत सौर दिवे मिळाल्यावर गावकरी भारावून गेले आणि त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाºयांचे आभार मानले. कोरोनामुळे पुण्यातील बाजारपेठा जवळपास तीन महिने बंद होत्या. व्यापारी पण आर्थिक संकटात होते. पण आपल्या कडे जे आहे ते समाजासाठी देण्याच्या वृत्तीने व्यापाºयांनी मदत केली. उपक्रमासाठी पुनीत बालन, गिरीश दंडवते, राजूशेठ साखरीया, रामदास तुळशीबागवाले, किरण भंडारी, प्रविण नहार, उमेश म्हंकाळे, कुशल पारेख,गणेश घम, चेतन कावरे, प्रविण देसाई यांचे सहकार्य लाभले. लातूरचा भूकंप असेल, सांगली कोल्हापूरचा महापूर असेल. तुळशीबाग व्यापारी असोसिएशन अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये कायमच मदत करीत असते. *फोटो ओळ - तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने हरिहरेश्वर येथील साक्षीभैरवी गावातील १०० कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले. व्यापाºयांनी प्रत्यक्ष जाऊन मदतकार्य केले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


तुळशीबाग व्यापाºयांच्या पुढाकाराने उजळली कोकणातील वाडी 


तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने कोकणातील हरिहरेश्वर येथे सौर दिव्यांचे वाटप 


 


पुणे : चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला बसलेला तडाखा आणि कोरोनामुळे कोकणवासीयांचे जीवन अजून बिकट झाले. कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील साक्षीभैरवी हे गाव पण ह्या तडाख्यातून सुटले नाही. अशा परिस्थितीत विजेचे खांब कोलमडून पडले. त्यामुळे संपूर्ण गाव गेले महिनाभर अंधारातच होते. अशावेळी तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने गावातील १०० कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. व्यापाºयांनी प्रत्यक्ष जाऊन मदतकार्य केले.


 


तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे नितीन पंडीत, मोहनशेठ साखरीया, रामदास तुळशीबागवाले, किरण चौहान, निकेत देसाई, जितेंद्र अंबासनकर, चेतन कावरे, संदेश जव्हेरी गणेश रामलिंग, किरण सावंत, राजेश शिंदे, पिंटूशेठ बिरादर तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, दत्ता भाऊ कावरे यांनी पुढाकार घेतला. 


 


या गावातील १०० कुटुंबांना सौर दिवे, धान्याचे कीट, गव्हाचे पीठ, चटई, बिस्किटे,साबण,सॅनिटायझर ,मेणबत्ती काडेपेटी,डासांची उदबत्ती आदी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. आपल्या वाडीत सौर दिवे मिळाल्यावर गावकरी भारावून गेले आणि त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाºयांचे आभार मानले. 


 


कोरोनामुळे पुण्यातील बाजारपेठा जवळपास तीन महिने बंद होत्या. व्यापारी पण आर्थिक संकटात होते. पण आपल्या कडे जे आहे ते समाजासाठी देण्याच्या वृत्तीने व्यापाºयांनी मदत केली. उपक्रमासाठी पुनीत बालन, गिरीश दंडवते, राजूशेठ साखरीया, रामदास तुळशीबागवाले, किरण भंडारी, प्रविण नहार, उमेश म्हंकाळे, कुशल पारेख,गणेश घम, चेतन कावरे, प्रविण देसाई यांचे सहकार्य लाभले. लातूरचा भूकंप असेल, सांगली कोल्हापूरचा महापूर असेल. तुळशीबाग व्यापारी असोसिएशन अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये कायमच मदत करीत असते.


 


*फोटो ओळ - तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने हरिहरेश्वर येथील साक्षीभैरवी गावातील १०० कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले. व्यापाºयांनी प्रत्यक्ष जाऊन मदतकार्य केले.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान