शैक्षणिक प्रगतीत वडिलांच्या भूमिकेला महत्वपूर्ण मानतात विद्यार्थी: ब्रेनली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २५ जून २०२०: फादर्स डेच्या पार्श्वभूमीवर ब्रेनलीने भारतातील युझर्ससमध्ये मुलांच्या शिक्षणातील वडिलांची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या जगातील सर्वात मोठया ऑनलाइन लर्निंग मंचाने २,१३७ सहभागींच्या सर्वेक्षणातून अनेक रंजक गोष्टींवर प्रकाश टाकला. तीन चतुर्थांशांपेक्षा जास्त युझर्सनी (७६.३%) मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत नोंदवले.


 


देशभरात लॉकडाउन असल्यामुळे वडिलांच्या भूमिकेत वाढ झाली का याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता याचे सकारात्मक निकाल सर्वेक्षणात दिसून आले. प्रतिसाद दिलेल्यांपैकी एक पंचमांश (२१.४ %) विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांचा सहभाग नुकताच वाढल्याचे सांगितले. तर ४८.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की लॉकडाउनच्या आधी आणि नंतरच्या स्थितीत त्यांच्या वडिलांची शिक्षणातील भूमिका सारखीच राहिली आहे.


 


मुलांनी अभ्यासात प्रगती करावी, यादृष्टीने पालक सक्रियतेने प्रयत्न करत आहेत, हे महत्त्वाचे आहे. याचे श्रेय एआय-एमएल समर्थित ऑनलाइन मंचांना जाते. यामुळे एकूणच सर्व सहभागींच्या अनुभवात क्रांती आणली आहे.


 


ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी, राजेश बिसानी म्हणाले, “ब्रेनललीसारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या पालकांमध्येही ऑनलाइन शिक्षणाची लोकप्रियता वाढत आहे. शाळा ऑफलाइन मोडवर गेल्यानंतरही हा ट्रेंड कायम राहिल, असा आम्हाला विश्वास आहे. कारण ऑनलाइन लर्निंग टूल्सचा कसा फायदा होतो आणि त्यापासून आनंद घ्यायला पालक शिकले आहेत."


 


मागील महिन्यात ब्रेनलीने मदर्स डे निमित्त आणखी एक सर्व्हे घेतला होता. त्यातही यासारखाच ट्रेंड पहायला मिळाला होता. सहभागींपैकी ४८.५% लोकांनी त्यांचे वडील अभ्यासात मदत करतात, असे सांगितले होते. यामागील सर्व्हेमध्ये हेही अधोरेखित झाले होते की, घरून अभ्यास सुरू होण्यापूर्वी ४४.४ टक्के मुलांचे वडील त्यांना अभ्यासात मदत करत नव्हते. मात्र आता ऑनलाइन शिक्षणाचे मंच वाढल्याने लॉकडाउन काळात मुलांच्या शिक्षणात वडिलांचा सहभाग वाढत असल्याने हे एक सकारात्मक लक्षण आहे.