संगीत क्षेत्रातील सूर्याचा अस्त - वाजीद खान यांचं निधन* 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल.....


  


*मुंबई :* संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव साजिद वाजीद. काल वाजीद यांच निधन झालं. हे कळताच मन सुन्न झालं या जोडीने मी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटासाठी एक गीत संगीतबद्द केलं होतं वाजीद यांनी ते गीत लिहल व गायलं होतं व साजिद व भोजपूरी सुपरस्टार रवी किशन यांनी या गीतावर थिरकले होते. त्या प्रसंगी मी त्यांच्याशी छोटेखानी इंटरव्ह्यू केला होता. अ.ब.क च्या प्रोमोशनला ते चला हवा येवू द्या च्या रंगमंचावर देखील आले होते. 


 


प्रसिद्ध संगीतकार वाजीदचे अ.ब.क चित्रपटातील हे गीत ठरले शेवटचे. अ.ब.क या चित्रपटातून या जोडीने मराठीत केले होते पदार्पण मी दिग्दर्शित मराठीतील बहुचर्चित अ. ब. क. या चित्रपटासाठी साजिद वाजीद या जोडीने संगीत दिले होते या चित्रपटात या जोडीने होळी वरती एक सुंदर गीत तयार केले होते. 


 


"पिचकारी मारो खेलो रे होली". हे गीत वाजिद यांनी स्वतः गायले होते. त्याच बरोबर संगीत - साजिद वाजिद या जोडीने दिले होते. तर गीतकार - साजिद - दानिश साबरी हे होते. 


 


तर या गाण्यावर नृत्य भोजपूरी सुपरस्टार रवि किशन आणि साजिद यांनी केले होते. प्रोडक्शन हाउस - ग्रेविटी एंटरटेनमेंट प्रोड्यूसर - मिहीर कुलकर्णी, तर चित्रपटाचे दिग्दर्शक - रामकुमार गोरखनाथ शेडगे हे होते.


 


सुपरस्टार सलमान खान याच्या अनेक चित्रपटांना संगीत देणाऱ्या संगीतकार जोडी साजिद - वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचं निधन झालं आहे.