इन्फिनिक्सने २ नवीन बजेट स्मार्टफोन केले लॉन्च

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


~ हॉट ९ आणि हॉट ९ प्रो १०००० पेक्षा कमी किंमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध ~


 


मुंबई, १ जून २०२०: ट्रांशन ग्रुपचा प्रिमियम स्मार्टफोन ब्रँड इन्फिनिक्सने हॉट ८ मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर हॉट ९ आणि हॉट ९ प्रो हे दोन नवीन बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. फ्लिपकार्टवर अनुक्रमे ८,४९९ रुपये आणि ९,४९९ रुपयांच्या प्राथमिक किंमतीत हे दोन्ही फोन उपलब्ध आहेत.


 


या दोन्ही स्मार्टफोनला ४ जीबी रॅम/६४ जीबी रोमसह ऑक्टा कोर मीडियाटेक हेलिओ पी २२ प्रोसेसरचे समर्थन आहे. तसेच ते अँड्रॉइड १० एक्सओएस ६.० डॉल्फिन सिस्टिमवर काम करतात. हे सर्व २.५ डी वक्र ग्लास युनिबॉडी फिनिशसह आकर्षक जेमकट टेक्सचर डिझाइनमध्ये आहे. यातून परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिझाइनचे मिश्रण असलेल्या स्मार्टफोन अनुभव मिळतो. या फोनमधील ५,००० एमएएचची बॅटरी १९ दिवसांच्या स्टॅण्डबाय वेळेसह सलग १४ तास व्हिडिओ प्लेबॅक, ४० तास फोर जी टॉकटाइम आणि १३ तासांच्या गेमिंगची सुविधा देते.


 


इन्फिनिक्सच्या हॉट ९ सीरीजमध्ये तिच्या परंपरेनुसार, या किमतीतील सर्वोत्कृष्ट कॅमरा देण्यात आला आहे. हॉट ९ मध्ये एफ/१.८ लार्ज अपार्चर आणि ट्रिपल एलईडी फ्लॅश असलेला १३ एमपी एआय क्वाड रिअर कॅमेरा आहे. तर हॉट ९ प्रोमध्ये एफ/1.8 लार्ज अपार्चरसह ६ ऑप्टिकल लेन्स व क्वाड एलईडी फ्लॅश असलेला ४८ मेगापिक्सेलचा एआय क्वाड रिअर कॅमेरा आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलची लेन्स असून त्याद्वारे उत्साही छायाचित्रकारांना अतिशय सफाईदारपणे लहान वस्तूतील बारकावे फोटोद्वारे टिपता येतील. तसेच ८ एमपी एआय सेल्फी कॅमेरा असून त्यात एफ/२. अपार्चर, समर्पित एलईडी फ्लॅश आणि पोरट्रेट, वाइड सेल्फी यासारखे अनेक कॅमेरा मोड्स आहेत.


 


हॉट ९ सीरीजचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची सुविधायुक्त ऑपरेटिंग सिस्टिम. अँड्रॉइड ६.० एक्सओएक्स डॉल्फिनवर ऑपरेट करत हॉट ९ आणि हॉट९ प्रो हे दोन्ही व्हिडिओ थीम कॉलिंगसारखे नाविन्यपूर्ण सुविधा देणारे वैयक्तिक अनुभव देतात. यामुळे डायलर कॉलला अधिक मनोरंजक बनवले जाते. तसेच फ्रंट आणि रिअर या दोन्ही बाजूस ३६० अंशाचे फ्लॅशलाइट चालू असतात. यात ‘हाइड अॅप’ हे अनुकुलनही आहे. याद्वारे सोशल आणि बँकिंग अॅप मिनिमाइज करून ठेवता येतात व अनऑथराइज्ड अॅक्सेसची जोखीम टाळता येते.