गोप्रेप टॅलेंट सर्च परीक्षेचे निकाल जाहीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


~ कुशाग्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान, मुंबईची सिया कोठारी ठरली मानकरी ~


 


मुंबई, २३ जून २०२०: ८ वी ते १२ वी वर्गांसाठी भारतातील लाइव्ह ऑनलाइन स्कूल प्रिपरेशन अॅप असलेले गोप्रेप हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमविषयक गरजा भागवते. यात जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश असून गोप्रेपने नुकताच, गोप्रेप टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (जीटीएसई)चा निकाल जाहीर केला. यात मुंबईतील डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सिया अभय कोठारी हिने सातवा क्रमांक पटकावला आहे. तिला १०० टक्के स्कॉलरशिप आणि विशेष पारितोषिक म्हणून फोन मिळाला आहे.


 


ही राष्ट्रीय पातळीवरील स्कॉलरशिपसाठीची पात्रता परीक्षा भारतातील सुपर १००० च्या शोधात घेण्यात आली. सुरक्षा आणि सुलभतेसाठी विद्यार्थ्यांच्या घरूनच १००० जणांची परीक्षा घेण्यात आली. ही दोन टप्प्यातील परीक्षा जवळपास १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी जीटीएसईचा दुसरा टप्पा पार केला, त्यांना राष्ट्रीय पातळीवरील १ कोटी रुपयांची स्कॉलरशिप गोप्रेपकडून मिळाली. होंडा अॅक्टिव्हा, वन प्लस स्मार्टफखोन्स, लॅपटॉप, कॅसिओ वॉचेस, अॅमेझॉन गिफ्ट ही विशेष पारितोषिके ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. गोप्रेपने वंचित कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी अतिरिक्त शिष्यवृत्तीची ऑफर दिली.


 


गोप्रेपचे संस्थापक विभू भूषण म्हणाले, “ जीटीएसई मागील अतिरिक्त हेतू म्हणजे भारतातील १००० सर्वाग कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी शोधणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आधार देणे. विद्यार्थ्यांसाठी ही एकूणच उत्कृष्टतेची चाचणी होती. देशभरात व्यापक स्तरावर विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शैक्षणिक कौशल्य दर्शवले.”


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image