कॉव्हेस्ट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरोपातील प्लास्टिक संघटनेचे नेतृत्व करणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


· शाश्वतता व सर्क्युलर इकॉनॉमी यावर विशेष भर


 


पुणे, 27 जून, 2020 : - कॉव्हेस्ट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्कस स्टेलेमन हे प्लास्टिक्सयुरोप या युरोपातील प्लास्टिक उत्पादकांच्या संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. पुढील तीन वर्षांसाठी 50 वर्षीय डॉ. मार्कस यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली. प्लास्टिक्सयुरोपला मान्यता व प्रसिद्धी मिळण्यासाठी योगदान देणारे डाउ केमिकल्सचे जेव्हिअर कॉन्स्टेन्टे यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत स्टेलेमन यांना शाश्वततेला चालना देणे आणि प्रामुख्याने सर्क्युलर इकॉनॉमी या क्षेत्रांतील संघटनेच्या कार्यावर अधिक भर द्यायचे आहे. 


 


"अनेक जागतिक आव्हाने विचारात घेता, खऱ्या अर्थी शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी, तसेच सर्क्युलर इकॉनॉमी अंगिकारण्यासाठी प्लास्टिक अतिशय महत्त्वाचे आहे," असे स्टेलेमन यांनी नमूद केले. "या संदर्भात, नवी उत्पादने तयार करण्यासासाठी संसाधने म्हणून एंड-ऑफ-लाइफ मटेरिअल आणि टाकाऊ साहित्य यांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत हे साहित्य अनियंत्रित पद्धतीने पर्यावरणामध्ये जाऊ देऊ नये. याचबरोबर, प्लास्टिक हे साहित्य शाश्वत असल्याने त्याचा वापर जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपला उद्योग युरोपला शाश्वततेच्या दिशेने जाण्यासाठी मदत करू शकतो." 


 


प्लास्टिक्सयुरोपमधील नव्या पदाबरोबरच, स्टेलेमन यांची नियुक्ती जर्मन असोसिएशन ऑफ केमिकल इंडस्ट्रीजचे (व्हीसीआय) उपाध्यक्ष म्हणून नुकतीच करण्यात आली आहे. ते युरोपीयन केमिकल इंडस्ट्री कौन्सिलचे सदस्य आणि सुसचेम युरोपीयन टेक्नालॉजी प्लॅटफॉर्म फॉर सस्टेनेबल केमिस्ट्रीचे अध्यक्षही आहेत. ब्रुसेल्स, फ्रँकफर्ट, लंडन, माद्रिद, मिलान व पॅरिस येथे केंद्रे असलेली प्लास्टिक्सयुरोप जगभरातील शंभर कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करत असून, या कंपन्या युरोपीय युनियनमधील 27 सदस्यांमध्ये, तसेच नॉर्वे, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान व युके येथे 90% हून अधिक पॉलिमर्सची निर्मिती करतात.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image