पेट्रोलपंप कर्मचाऱ्याना अन्न-धान्य किट वाटप*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*


 


पुणे:- लॉक डाउन काळात अत्यावश्यक सेवा देणारे शिवाजीनगर शिवसेना महिला आघाडी तर्फे भागातील सुमारे 430 पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना गहू तांदूळ साखर तेल सहा 15 वस्तूंचे किट शिवसेना नगरसेविका शहर संघटिका संगीता ठोसर ,सविता मते,श्वेताताई चव्हाण यांचा हस्ते वाटप केले.


   डेक्कन,शिवाजीनगर, औंध, बोपोडी येथील खडकी येथील हे रहिवासी कोरोना काळात अनेक नागरिकांच्या संपर्कात जावे लागते याची भीती वाटते मात्र ,पंप चालक आमची काळजी घेतात अशी भावना कर्मचारी व्यक्त करून हे किट आम्हाला दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


 नयना वाघ यांनी आयोजित 13 पंपावर या कार्यक्रमात मतदार संघ संघटिका कलावती घाणेकर, पौर्णिमा बहिरट, दीपाली शिगवण, सोनिया मुंढे ,सुप्रिया सरकारआदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भागेश्री सागवेकर यांनी स्वागत व आभार मानले