शिवराज्याभिषेक दिनी पुष्पवृष्टी व सजावट स्पर्धेत जगभरातून सहभाग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेसनोट प्रसिध्दीसाठी -


-


शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात सजावट स्पर्धा 


 


पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात केवळ पुणे किंवा भारतातच नव्हे, तर जगभरातील विविध देशांतील भारतीयांना शिवराज्याभिषेक सोहळा आपापल्या घरी साजरा केला. पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुबई, अबुधाबी, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया, जर्मनी आदी देशांतील भारतीयांनी घरामध्ये सजावट करुन हा उत्सव साजरा केला. तर, पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस च्या आवारातील जगातील पहिल्या ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळ्यासमोर पुष्पवृष्टी करीत शिवप्रेमींनी सोशल डिन्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळून सहभाग घेतला. 


 


शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिकरित्या स्वराज्यपुढी न उभारता घराघरात साजरा करावा, यासाठी शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय एसएसपीएमएस च्या आवारातील ऐतिहासिक पुतळ्यासमोर पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले. तसेच पुणे पोलिसांना 10 सॅनिटाझर स्टँड व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी सचिन पायगुडे, शांताराम इंगवले, अनिल पवार, शंकर कडू, महेश मालुसरे, मंदार मते, निलेश जेधे, गोपी पवार, मयुरेश दळवी आदी उपस्थित होते. 


 


अमित गायकवाड म्हणाले, समितीतर्फे सन २०१३ पासून समितीच्या वतीने ही संकल्पना राबविण्यात येते. संकल्पनेचे यंदा ८ वे वर्ष असून प्रथमच या संकल्पनेला स्पर्धेचे स्वरुप देण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक म्हणजे शौर्याचे, पराक्रमाचे, अभिमानाचे, तेजाचे प्रतिक आणि शिवशक प्रारंभाचा स्वराज्य नववर्षाचा पहिला दिवस. त्यामुळे हा दिवस सण व महोत्सवाप्रमाणे घराघरात साजरा व्हावा, ही यामागील संकल्पना आहे. हा दिन केवळ भारताचा नाही, तर जगाचा अभिमान दिन आहे. त्यामुळे यापुढे हा दिन विश्व स्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा. 


 


स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी स्वराज्यगुढी भगव्या स्वराज्यध्वजासह घरोघरी उभारुन शिवरायांचे तैलचित्र, पुतळा, रंगावली, फुले वा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन आकर्षक सजावट केली. तसेच पारंपरिक पोशाख परिधान करुन घरात गोडधोड बनवून सहकुटुंब हा दिन साजरा केला. ते करतानाचे दोन फोटो मो. ९८२२०८३७१० या क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन समितीने केले आहे. स्पर्धा दोन विभागात होणार असून भारतात व भारताबाहेरील कुटुंबे यामध्ये सहभागी झाली आहेत. स्पर्धेकरीता ७ जून दुपारी १२ पर्यंत आलेले फोटो ग्राह्य धरले जाणार असून विज्येत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक दिले जाईल. या महिन्यात स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.


 


* फोटो ओळ : शिवजयंती महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुबई, अबुधाबी, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया, जर्मनी आदी देशांतील भारतीयांनी घरामध्ये सजावट करुन हा उत्सव साजरा केला. तर, पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस च्या आवारातील ऐतिहासिक पुतळ्यासमोर पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी देखील सोशल डिन्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळून सहभाग घेतला.


 


तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image