वात्रट सोसायटीमध्ये गुंजणार गुंडाप्पाचे सूर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


 


 


'आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकेनं थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयाची मेजवानी घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. सोळा कलाकारांची फळी या मालिकेत काम करताना दिसत आहे. दर आठवड्याला नवनवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळताहेत. अशाच एका अतरंगी पात्राची एंट्री लवकरच होणार आहे.


 


बसवराज रामलिंगम मोक्षगुंडम सुब्रमण्यम वेंकटेशम गुंडाप्पा अर्थात ‘नुसताच गुंडाप्पा’ हे पात्र सर्वांचा लाडका पंढरीनाथ कांबळे साकारणार आहे. आपल्या विनोदी अभिनयानं आजपर्यंत पंढरीनाथ उर्फ पॅडीनी सर्वांना हसवलं आहे. आताही तो अशाच एका विनोदी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


 


थोडक्यात सांगायचं तर गुंडाप्पा कन्नड आहे आणि तो भीषण मराठी बोलतो. तो अतिशय बेसूर गायक आहे. गुंडाप्पाच्या या एंट्रीमुळे वात्रट सोसायटीत अजून काय धमाल उडते, हे बघण्यासाठी पाहत राहा 'आठशे खिडक्या नऊशे दारं' सोमवार ते गुरुवार रात्री 10 वा. सोनी मराठी वाहिनीवर.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image