अंतिम वर्षाच्या पदवी ,पदव्युत्तर आदी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या बाबत तात्काळ ठोस निर्णय घेणेबाबत.... सागर भारत साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका,छावा क्रांतीवीर सेना कराड तालुका

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


दि.१२/०६/२०२०


प्रति ,


मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब


मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.


द्वारा:- मा.जिल्हाधिकारी सातारा


यांस..


 


मा.महोदय ,


मी सागर भारत साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका,छावा क्रांतीवीर सेना कराड तालुका वतीने आपणास नम्र निवेदन की मुख्यमंत्री महोदय व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपण सयुक्तिक पणे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून सरासरी गुणांकन देऊन निकाल घोषित करण्याचे ठरवले होते परंतु अद्याप काहीही लेखी आदेश लागू झालेला नाही. त्यातच राज्यपाल महोदयांनी परीक्षा घ्याव्या असे मुख्यमंत्री ह्यांना पत्राव्दारे कळवले त्यामुळे अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेविषयी संभ्रमाअवस्था निर्माण झालेली आहे.


         अंतिम वर्षातील परीक्षा संदर्भातील राजकारणा मूळे विद्यार्थी ,पालक संभ्रमात पडले असून सध्या च्या कोविड रुग्ण वाढीच्या वातावरणात विद्यार्थांनी,पालकांनी 


 राज्यशासनाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते परंतु राज्यपालांनी कुलपती या अधिकाराने परीक्षा संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवल्याने संभ्रम तयार झाला आहे.


सद्या Continuous assessments (सतत मूल्यांकन) हि कार्यप्रणाली चालू असल्या कारणाने पदवीच्या विद्यार्थ्यांना सर्व सेमिस्टर चे SGPA (सेमिस्टर श्रेणी) ची सरासरी करून पदवी वर CGPA (फायनल श्रेणी)दिली जाते. जर इंजिनिरीगचा विचार केला तर एका सेमिस्टर मध्ये २ परीक्षा होता इनसेम आणि एन्डसेम म्हणजे आता पर्यंत इंजिनियरिंगचे ७ सेमिस्टर व ह्या सेमिस्टर ची इनसेम परीक्षा झाली आहे तर मग ८ सेमिस्टर च्या एका परीक्षेचा हट्ट का ?


मे महिन्याच्या अखेर पर्यंत सर्व परीक्षा व प्रकल्प परीक्षा संपलेल्या असतात व जुलै महिन्यात निकाल लागला जातो पण आताच्या परिस्थितीत जर परीक्षा जुलै मध्ये घेतली तर निकाल येण्या साठी सप्टेंबर लागणार तो पर्यंत पदवीत्तर जसे MBA, ME, MS, Msc, MA अश्या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेचे काय होणार ? 


          महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याचा पर्याय असला तरी सरकार ने विद्याथ्याचे बरेचं वस्तीगृह हे कोरोना विलागीकरन रुग्णासाठी घेतले आहे काही ठिकाणी महाविद्यालयाचे मैदाने व खोल्या घेतल्या आहे अश्या परिस्तिथीत विद्याथ्यांची गैरसोय होऊ शकते.


बहुतेक विद्यापीठांचा मार्च नंतरचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही मग परीक्षा कुठल्या अभ्यासक्रमावर घेणार?


कोविड मुळे परीक्षा लटकल्या असल्या तरी महाराष्ट्र शासन, विद्यापीठं व राज्यपाल ह्यांना एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेऊन केवळ घोषणा न करता ठोस भूमिका घेऊन परीप्रत्रक जाहीर करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा व त्यांची मानसिक घालमेल दूर करून पुढील भवितव्यासाठी त्यांना वाटचाल करून द्यावी ही नम्र विनंती.


विनीत - 


सागर साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका,


रोहित पंडित सुतार-संपर्कप्रमुख कराड तालुका,


विशाल डोंगरे-संघटक कराड तालुका,


अक्षय खाडे-सरचिटणीस कराड तालुका,


कृष्णत तुपे-उपाध्यक्ष कराड तालुका,


सुजित लादे-कार्याध्यक्ष कराड शहर,


सिद्राम कसकी-संघटक कराड शहर.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image