प्रियदर्शन करतोय वेबदुनियेत पदार्पण, 'भुताटलेला' पहा एमएक्स प्लेयवर*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*


 


हंगामा ओरिजनलची ५ एपिसोडची ही सीरिज एक उत्तम हॉरर कॉमेडी आहे.


 


खर काय खोट काय याचा कधी विसर पडलाय का तुम्हाला किंवा कोणी सतत पाठलाग करतंय अस जाणवलं आहे का? असच काही झालंय ते म्हणजे लवकर लग्नाच्या बेढीत अडकणाऱ्या 'रायबा'सोबत, ज्याच्या भाग्यात शिवानीच नाव योग्य जोडीदार म्हणून लिहिलं आहे. पण त्याला त्याच्या लग्नाच्या विधीत सतत दिसते आहे ते अनोळख्या मुलीचं भूत जी आहे 'सुधा'.


 


मराठी चित्रपट सृष्टीत टाईमपास, हलाल, चोरीचा मामला अश्या उत्तमोत्तम चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकलेला प्रियदर्शन जाधव या वेब सीरिज मधून वेबच्या दुनियेत पाऊले ठेवतो आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनात आपल्या उत्तम अभिनयाने घर केलेल्या प्रियदर्शनने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध केले आहे. कॉमेडी पासून गंभीर चित्रपटातून स्वतःला सिद्ध करणारा प्रियदर्शनची "भुताटलेला" ही हॉरर कॉमेडी सीरिज मराठी सोबतच हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे.


 


शिवाजी लोटन पाटील या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली ही सीरिज रायबा आणि शिवानी यांच्या लग्नाच्या आधी घडलेल्या घटनेवर आहे. प्रियदर्शन जाधव या सीरिज मध्ये रायबाच्या भूमिकेत तर शिवानीच्या भूमिकेत सुरभी हांडे दिसणार आहे. रायबाच्या हळदीच्या दिवशी तो भुता प्रेतांना दूर ठेवण्यासाठी आईने दिलेली कट्यार विसरतो त्याच वेळी त्याला जाणवत की कोणीतरी अज्ञात त्याचा पाठलाग करतंय. प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे यांच्या सोबतच योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील हे सुद्धा या सीरिज मध्ये आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रायबासोबत नंतर काय काय होणार याच रहस्य उलघडायचे असेल तर सर्व एपिसोड निशुल्क पहा एमएक्स प्लेयर वर.


 


 


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image