माजी आमदार युनूसभाई शेख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*_उपमुख्यमंत्री कार्यालय,_*


 


*_मंत्रालय, मुंबई._*


दि. 14 जून 2020.


माजी आमदार युनूसभाई शेख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*


 


मुंबई दि. 14: माजी आमदार युनूसभाई शेख साहेबांचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. सोलापूरकर त्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवतील असा विश्वास व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युनूसभाईंना श्रद्धांजली वाहिली.


               उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, माजी आमदार युनूसभाईंनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली. या कार्यकाळात त्यांनी सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.


             त्यांच्या कामाची आणि निष्ठेची दखल घेत आदरणीय शरद पवार साहेबांनी युनूसभाईंना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. सामान्य सोलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम आग्रही राहिले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या विविध प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे.


*****