पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*राजकारण बाजुला ठेवुन संकटकाळी समाजकार्य कस कराव याच उत्तम उदाहरण म्हणजे सुरज बाळासाहेब चौधरी *
कोरोना च्या महामारी च्या काळात आम्हाला म्हणण्यापेक्षा कदाचित सर्वांनाच एक गोष्ट लक्षात आली असेल की, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा ? राजकिय वारसा असणारे किंवा कोणाच्या मेहरबानीने तयार झालेले जे नागरिकांच्या समस्या सोडवणे तर सोडा पण समजुन घेण्यासाठी पण बाहेर पडायला तयार नव्हते किंवा सर्व गोष्टींमध्ये राजकारण करु पाहणारे आणि दुसरीकडे पुण्याहुन येवुन आपल्या परिसरामध्ये उपाययोजना राबवणारा सुरज बाळासाहेब चौधरी काही लोकांना माहीती नसेल म्हणुन मुद्दाम सांगतो
१) परिसरातील बंद झालेले सर्व दवाखाने पाठपुरावा करुन सुरु केले.
२) वृद्धांसाठी दवाखान्यात ये-जा करण्यासाठी श्री प्रविण कांबळे यांच्या सहकार्याने मोफत रिक्षा सेवा सुरु केली.
३) रक्तदान शिबीराचे आयोजन केले.
४) परिसरातील निराधारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केली.
५) ना नफा ना तोटा या तत्वावर नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करुन देणे.
६) कोरोना सोल्जर म्हणुन प्रभागात उत्तम काम सुरु आहे.
७) सर्वांच्या घरोघरी जावुन लोकांच्या समस्या जानुन घेवुन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
८) नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक श्री राजेंद्र सोनवने यांच्या सहकार्यांने वेळोवेळी औषध फवारणी करुन घेतली व हे सर्व फक्त आपण आपल्या समाजाला देण लागतो हे तत्व व सामाजिक बांदीलकी जपण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन केलेले कार्य.