खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून अपंग आणि दिव्यांग यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून अपंग आणि दिव्यांग यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप


कर्जत,ता.15 गणेश पवार


                          मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील दिव्यांग आणि अपंग लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.नेरळ शिवसेना शाखा कार्यालयात नेरळ शहर आणि परिसरातील दिव्यांग आणि अपंग यांना हे वाटप करण्यात आले.तर कर्जत शहरात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिव्यांग,अपंग यांच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू यांचे किटचे वाटप केले


                        दोन वर्षांपूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग यांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनतर दिव्यांग यांचे मेळावे घेऊन मदत आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले होते.त्यामुळे खासदार बारणे यांनी लॉक डाऊन काळात दिव्यांग यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.नेरळ भागातील दिव्यांग यांना जीवनावश्यक वाटप शिवसेना शाखा कार्यालयात करण्यात आले.त्यावेळी नेरळ शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरे,नेरळ चे सरपंच रावजी शिंगवा,उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे आदी प्रमुख यांचे हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी माजी शहर प्रमुख भास्कर क्षीरसागर,जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर मोरे,शाखा सल्लागार ऍड अजित मंडलिक,अतुल शहा,गट प्रमुख पप्पू जाधव, युवासेनेचे पदाधिकारी उमेश कवाडकर, परेश सुर्वे,देवा गवळी,चेतन गुरव,निलेश बंदरकर,करण मोरे आदी कार्यकर्ते हे अपंग आणि दिव्यांग यांना जीवनावश्यक वस्तू यांचे किट पोहचविण्याची मदत केली. यावेळी नेरळ मध्ये अपंग सेवाभावी संस्था यांचे अपंग कार्यकर्ते यांनी यादी नुसार दिव्यांग यांना व्यवस्थित मदत देण्याचे काम केले.


      कर्जत शहरात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पालिकेच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठवलेले धान्याचे किट अपंग आणि दिव्यांग यांना घरपोच वाटप करण्यात आले.त्यावेळी नगरसेविका संचीता पाटील, नगरसेविका विशाखा जिनगिरे, नगरसेविका प्राची डेरवणकर, नगरसेविका वैशाली मोरे,आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.