बाजारातील निर्देशांकांचा सकारात्मक व्यापार; निफ्टीने १० हजारांपुढील पातळी कायम ठेवली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, १९ जून २०२०: भारतीय बाजार निर्देशांकांनी आजच्या सत्रात सलग दुस-या दिवशी वित्तीय क्षेत्र तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजमधील बढतीद्वारे मोठ्या प्रमाणावर नफा कमावला. निफ्टीने १० हजारांवरील पातळी कायम राखण्यात यश मिळवले. निफ्टीमध्ये आज १.५१% किंवा १५२.७५ अंकांची वाढ होऊन तो १०,२४४.४० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्येही १.५३% किंवा ५२३ अंकांची वाढ होऊन तो ३४,७३१.७३ वर स्थिरावला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज सुमारे १७५९ शेअर्सनी नफा कमावला. तर ८४१ शेअर्समध्ये घट झाली. तसेच १४५ शेअर्सच्या स्थितीत बदल झाला नाही. आरआयएल (६.४८%), बजाज फायनान्स (६.५५%), टाटा मोटर्स (५.७६%), बजाज फिनसर्व्ह (९.१७%) आणि भारती इन्फ्राटेल (४.९९%) यांचा बाजारातील टॉप गेनर्समध्ये सहभाग होता. तर इंडसइंड बँक (२.२०%), वेदान्ता (१.२६%), एचसीएल टेक (१.२०%), एमअँडएम (१.३१%) आणि आयटीसी (१.१३%) हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांनी अनुक्रमे १.०३% आणि १.३७% एवढी वृद्धी दर्शवली.


 


देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी झाल्याने आजच्या सत्रात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत किरकोळ घसरणीसह ७६.१८ रुपयांवर आला.


 


आज युरोपियन बाजारात सकारात्मक व्यापार झाला. कारण गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या देशांमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा कमी-जास्त असल्याने गुंतवणूकदारांनी थोडी वृद्धी दर्शवली. एफटीएसई १०० चे मूल्य १.३८% नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे मूल्य ०.८१% नी वाढले. जागतिक बाजाराने आज सकारात्मक स्थिती दर्शवली. नॅसडॅकचे शेअर्स ०.३३%, निक्केई २२५ चे ०.५५% आणि हँगसेंगचे ०.७३% नी वाढले.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या