ग्रो’चा स्टॉक गुंतवणूकीत प्रवेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ गुंतवणूकदारांकरीता शेअर्समध्ये गुंतवणूक सोपी करण्याचा उद्देश ~


 


मुंबई, १२ जून २०२०: सर्वात लोकप्रिय गुंतवणूक मंच असेलल्या 'ग्रो' (Groww) ने नव्या पिढीतील गुंतवणूकदारांसाठी शेअर गुंतवणुकीचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने आता स्टॉक गुंतवणुकीत प्रवेश केला आहे. स्टॉक गुंतवणुकीची सुरुवात करून ग्रो ने वित्तीय सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी एक प्रयत्न केला आहे.


 


ग्रोवर गुंतवणूकदार कंपनीची वित्तीय कामगिरी, शेअर होल्डिंग पॅटर्न्स, पीअर कंपॅरिझन्स इत्यादी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहू शकतील. त्यांची सर्व मालमत्ता ते सिंगल डॅशबोर्डवर पाहू शकतील तसेच रिअल टाइममध्ये त्यावर निगराणी ठेवू शकतील. यामुळे ज्यांना स्वत: गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा मंच खूप अनुकुल आहे.


 


ग्रो चे सहसंस्थापक आणि सीईओ ललित केशरे म्हणाले, 'प्रत्येकाला वित्तीय सेवेचा लाभ मिळावा तसेच त्यात पारदर्शकता असावी, यासाठी आम्ही ग्रोची सुरुवात केली. स्टॉक्सच्या लाँचिंगद्वारे आम्ही देशातील नव्या पिढीतील कोट्यवधी गुंतवणुकदारांना स्टॉक गुंतवणुकीचा अधिक आनंददायी अनुभव देण्यासाठी आम्ही खुले आहोत. स्टॉक्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा अनेक यूझर्सनी व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही व्यासपीठावर जवळपास दोन वर्षांपासूनच काम करायला सुरुवात केली. वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही पहिल्या गुंतवणूकादारांना आमंत्रित करून टप्प्या-टप्प्याने रोल आउट सुरु केले. या आमंत्रणानंतर १ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी स्टॉक अकाउंट्स सुरु केले आणि २० लाखांपेक्षा जास्त व्यवहारही केले. पुढील काही आठवड्यात हे व्यासपीठ सर्व यूझर्ससाठी खुला होईल.”


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image