सलग चौथ्या दिवशी बाजारात सकारात्मक स्थिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ निफ्टी १० हजारांच्या पातळीच्या पुढे, सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वाढला ~


 


मुंबई, २३ जून २०२०: विविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांच्या पातळीपुढे धाव घेतली. निफ्टीत १.५५% किंवा १५९.८० अंकांची वाढ झाली. तो १०.४७१.०० वर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.४९% किंवा ५१९.११ अंकांनी वाढून ३५,४२०.४३ वर बंद झाला. जवळपास १९२९ शेअर्स नफ्यात होते, ७४९ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्सची स्थिती बदलली नाही.


 


बजाज फायनान्स (९.२८%), एलअँडटी (६.७३%), एनटीपीसी (५.७७%), इंडसइंड बँक (६.५३%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.४३%) हे बाजारातील टॉप मार्केट गेनर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीज (१.४०%), भारती एअरटेल (०.६३%), वेदांता (०.१४%) आणि मारुती सुझुकी (०.१०%) हे आजच्या सत्रातील बाजाराती टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप १.६९% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.७८% ची वाढ दिसून आली.


 


इक्विटी बाजारातील गुंतवणुकदारांच्या सकारात्मक भावनांमुळे आज भारतीय रुपयाने सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मक स्थिती दर्शवली. त्यामुळे अमेरिकी डॉलर थोडा कमकुवत झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलननेत भारतीय रुपया ७५.७५ रुपयांवर स्थिरावला.


 


अमेरिका-चीन व्यापार करारातील वाढती चिंता आणि जगभरातील कोव्हिड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या असूनही जागतिक बाजारात आज सकारात्मक व्यवहार दिसून आला. नॅसडॅक कंपनीचे शेअर्स १.११%, एफटीएसई १०० चे शेअर्स १.२२% नी आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.६५% तर निक्केई २२५ चे शेेअर्स ०.५० % नी वाढले. तर हँगसेंगचे शेअर्स आजच्या सत्रात १.६२% नी वधारले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image